अकोला : पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी अखेर ३० जूनला आदेशावर स्वाक्षरी करीत प्रशासकीय बदल्यांचे आदेश निर्गमित केले. त्यात अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले असून, अलिकडच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या पोलिस निरीक्षकांना ग्रामीण भागातील पोलिस स्टेशनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात चांगली कामगिरी बजावल्यामुळे शहरातील महत्त्वाच्या पोलिस स्टेशनची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला. अकोट शहरचे पोलिस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे यांच्याकडे सिटी कोतवाली पोलिस स्टेशनची जबाबदारी सोपविण्यात आली. अकोट शहर पोलिस स्टेशनची जबाबदारी अकोट फैलचे पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांच्याकडे सोपविण्यात आली.
अकोट फैलचे पद रिक्त झाले आहे. सिव्हिल लाईनसचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्याकडे मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचा प्रभार देण्यात आल्याने त्यांच्या जागेवर पोलिस नियंत्रण कक्षातील वैशाली भारत मुळे यांची सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पोलिस नियंत्रण कक्षातीलच किशोर शेळके यांच्याकडे पातूर, डाबकी रोड पोलिस स्टेशनचे शिरीष खंडारे यांच्याकडे बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आला. याशिवाय सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी किशोर वानखेडे यांच्याकडे अकोट फैल पोलिस स्टेशनचे दुय्यम अधिकारी म्हणून प्रभार देण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे चंद्रशेखर कडू यांची नियुक्ती करण्यात आली. बदली झालेले पोलिस निरीक्षक सध्याचे नियुक्ती ठिकाण नवीन नियुक्तीचे ठिकाण प्रकाश अहिरे अकोट शहर सिटी कोतवाली वैशाली मुळे नियंत्रण कक्ष सिव्हिल लाईन्स, नितीन लेव्हरकर नियंत्रण कक्ष जुने शहर, मनोज केदारे नियंत्रण कक्ष डाबकी रोड, चंद्रशेखर कडू सिटी कोतवाली एमआयडीसी, महेंद्र कदम अकोट फैल अकोट शहर, सचिन यादव मूर्तिजापूर शहर, तेल्हारा सेवानंद वानखडे जुने शहर, दहिहांडा भाऊराव घुगे सिव्हिल लाईन्स, मूर्तिजापूर शहर शिरीष खंडारे डाबकी रोड, बार्शीटाकळी किशोर शेळके नियंत्रण कक्ष पातूर, संजय खंदाडे बोरगाव मंजू आर्थिक गुन्हे शाखा, विजय नाफडे आर्थिक गुन्हे शाखा सायबर सेल.
बदली झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक
विजय प्रकाश हिवरखेड सिव्हिल लाईन्स (दुय्यम अधिकारी), राहुल देवकर मूर्तिजापूर शहर खदान (दुय्यम अधिकारी), योगेश वाघमारे नियंत्रण कक्ष खदान (दुय्यम अधिकारी), अजयकुमार वाढवे पिंजर जुनेश शहर (दुय्यम अधिकारी), किशोर वानखेडे एमआयडीसी अकोट फैल (दुय्यम अधिकारी), गोविंदा पांडव मूर्तिजापूर ग्रामीण ठाणेदार हिवरखेड, अनंत वडतकर उरळ मूर्तिजापूर (दुय्यम अधिकारी), सुरेंद्र राऊत दहिहांडा ठाणेदार मूर्तिजापूर ग्रामीण, सूरज सुरोशे एटीएस ठाणेदार माना, राहुल वाघ सायबर सेल ठाणेदार पिंजर, पंकज कांबळे सिव्हिल लाईन्स बाळापूर (दुय्यम अधिकारी), गोपाल ढोले स्थानिक गुन्हे शाखा ठाणेदार उरळ, विनोद घुईकर बाळापूर बाळापूर एसडीपीओ रिडर, महेश गावंडे स्थानिक गुन्हे शाखा पोलिस अधीक्षकांचे रिडर, कैलास भगत माना स्थानिक गुन्हे शाखा, ज्ञानोबा फड तेल्हारा स्थानिक गुन्हे शाखा, महादेव पडघन खदान अकोला शहर एसडीपीओ रिडरची जबाबदारी असेल.