Home » बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध सूरत पोलिसांत तक्रार दाखल

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध सूरत पोलिसांत तक्रार दाखल

by Navswaraj
0 comment

सूरत : वैद्यकीय उपचारादरम्यान वॉर्डाबॉयला मारहाण केल्याप्रकरणी सूरत पोलिसांत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख असून आपल्या आक्रमक पावित्र्यासाठी त्यांची सर्वत्र ख्याती आहे.

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे अपक्षांसह अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना गुजरात सरकारच्या वाहनातून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये आमदार नितीश देशमुख यांनी वॉर्ड बॉयला मारहाण केल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. देशमुख यांना सुरतमध्ये रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. यावेळी ते हॉटेलमधून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची वादावादी झाली. त्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांना कोणतेही चुकीचे इंजेक्शन देण्यात आले नाही, असे सिव्हिल रुग्णालय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उपचार सुरू असताना त्यांची आणि वॉर्डबॉय यांची बाचाबाची झाली. त्यात त्यांनी वॉर्डबॉयला मारल्याचा दावा रुग्णालयाने केला. त्याची कायदेशीर नोंदही रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे. भविष्यात देशमुख यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हाही या नोंदीच्या आधारे दाखल होऊ शकतो, असे कायदेतज्ज्ञ म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!