Home » अकोल्यात नववीतील मुलाने केला आईचा खून

अकोल्यात नववीतील मुलाने केला आईचा खून

by Navswaraj
0 comment

अकोला : दहीगाव गावंडे शेतशिवारात आठवडाभरापूर्वी एका ४० वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा खून तिच्याच नववीत शिकणाऱ्या मुलाने केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी मंगळवार, १३ जून २०२३ रोजी यासंदर्भातील माहिती दिली.

महिलेच्या डोक्यावर अन् अंगावर ठिकठिकाणी दगडानं मारल्याच्या जखमा होत्या. अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला पोलिसांनी उलगडा केला. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या १५ वर्षीय मुलाचा हात असल्याचं समोर आले आहे. या हत्या प्रकरणात हत्येचे मूळ कारणाची  खळबळजनक माहिती देखील समोर आली. मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. ४ जूनला दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आईच्या खुनाचा कट रचला अन् तिचा दगडानं ठेचून खून केला. संगिता राजू रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राह्मणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे, अकोला) असे मृत महिलेचे नाव आहे.

रविवार  ४ जूनपासून संगिता ही गावातून बेपत्ता झाली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी (६ जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याच समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणात बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हत्याचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. संगिता हिच्याच १५ वर्षे वयाच्या मुलाने तिची (आईची) हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव यांनी केला आहे.

संगिता कामासाठी पारसला रेल्वेने जाणे येणे करायची. दररोज प्रमाणे ४ जून रोजी देखील दहिगाव गावातून शेत रस्त्याने अन्वी मिर्झापुरमार्गे बोरगांव मंजू रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली होती. संगिता ही रस्त्याच्या मधोमध म्हणजेच सामसूम शेत रस्त्यात पोहोचली असता, तिच्याच मुलाने येथे येत दगडाने आईच्या डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी वार करून खून केला. हत्यानंतर मृतदेह कोणाला दिसु नये याकरीता रस्ताचे बाजूला असलेल्या नालीमध्ये टाकुन त्यावर काटेरी झुडपे टाकुन झाकुन टाकले. पुढे ६ जून रोजी तिचा मृतदेह आढळून आला अन् संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. पुढील तपास बोरगावमंजू पोलिस स्टेशन चे संजय खंदाडे हे करीत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!