Home » शेगावात तीन जणांकडून पिस्तुलासह काडतुस जप्त

शेगावात तीन जणांकडून पिस्तुलासह काडतुस जप्त

by Navswaraj
0 comment

शेगाव (जि. बुलडाणा) : संत नगरी शेगाव येथे तीन जणांकडून एक पिस्तूल व चार जीवंत काडतुस जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली.

रविवारी रात्री शेगाव-वरवट मार्गावरील बुरुंगले विद्यालयाजवळ तैनात पोलिसांनी एक मोटारसायकल अडविली. वाहन चालकासह तिघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तूल, ४ जीवंत काडतुसे, ३ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल आणि दुचाकी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात आरोपी हे मध्य प्रदेशच्या सिमेवरील संग्रामपूर तालुक्यातील पातूरडा ( जि. बुलढाणा) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. शेख अकबर शेख हरुन (वय २१), जीवन तेजराव गाडे (वय १८) ही दोन आरोपींची नावे आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या तिघांनी शेगावात पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!