Home » अकोल्यातील खामखेडमध्ये तलवार घेऊन गावात माजवली दहशत

अकोल्यातील खामखेडमध्ये तलवार घेऊन गावात माजवली दहशत

by Navswaraj
0 comment

अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवानंतर एकाने तलवार हाती घेऊन दहशत पसरविली. अकोला जिल्ह्यातील खामखेड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पातूर पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

खामखेड येथे एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन दहशत पसरविल्याने गावात खळबळ उडाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्याने पराभूत उमेदवार समर्थकाने हातात तलवार घेऊन मतदारांना मत का दिले नाही, आता सर्वांचा हिशोब होईल, असे म्हणत गावात चांगलाच उच्छाद मांडला. याप्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश धोंडूराम गुंजकर हा हातात तलवार घेऊन गावात शिवीगाळ केली.

सुरेश गुंजकर याने एका महिलेवर हल्लाबोल करून तिचा हात पिरगाळून झटापट केली.  या झटापटीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटली, त्या वयोवृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा राजू काळे ( वय 24 ) रा.खामखेड यास सुरेश गुंजकर याने धक्काबुक्की करीत असताना कृष्णा यांच्या छातीजवळ तलवार लागली. यात तो किरकोळ जखमी झाला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!