Home » अकोल्यात आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत

अकोल्यात आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे अकोल्यात जोरदार स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे पितापुत्र ‘डॅमेज कंट्रोल’साठी प्रयत्न करीत आहेत. अकोल्यातही शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. त्यानंतरही आदित्य यांचे जोरदार स्वागत झाले.

छायाचित्र सौजन्य : विक्की ठाकूर

आमदार नितीन देशमुख, शहर प्रमुख राजेश मिश्रा, रुपेश पाटील, विक्की ठाकूर आदिंसह उद्धव ठाकरे समर्थित गटाने आदित्य यांचे उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांचे पुष्पहार घालून व फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. विदर्भातील दौऱ्यापश्चात आदित्य काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही सहभागी होणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!