Home » उमेदवार लादणाऱ्या पक्षांना फटका बसणार

उमेदवार लादणाऱ्या पक्षांना फटका बसणार

by Navswaraj
0 comment

अकोला : निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. परंतु निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले आपल्या कामाला लागले आहेत. इच्छुकांची संख्या मोठी खुप मोठी आहे. राजकारणातील घडामोडी तसेच दररोज होत असलेल्या बदलांमुळे त्यांची तगमग आणि बेचैनी वाढली असली तरी कार्यक्रम, उपक्रम, पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून स्वतःचे सादरीकरण करणे सुरू असून, विशिष्ट पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष प्रमुखांकडे वर्णी लावत आहेत.

राजकीय पक्ष देखील उमेदवारांचा शोध घेत असून त्या दृष्टिकोनातून चाचपणी करणे सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उमेदवार विशिष्ट वाॅर्ड किंवा प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे तो तेथील रहिवासी असल्यास, त्याला त्याभागातील समस्यांची जाण, आणि सोडवण्याची आपुलकी असते. पक्षांनी अपवाद वगळता कोरीपाटी असलेले ताज्या दमाचे अभ्यासू उमेदवार द्यावेत असे अनेक मतदारांना वाटते. परंतु पक्षश्रेष्ठीं भरगच्च देणगी देणार्या उमेदवाराला प्राधान्य देतात, अशा परिस्थितीत काही वेळा बाहेरचा उमेदवार देखील लादल्या जातो.

पक्ष बदलाचे प्रमाण वाढल्यामुळे आज एका पक्षात असलेला महीन्याभराने दुसऱ्या तर सहा महिनेनंतर तिसऱ्या पक्षात असतो, त्यामुळे पक्षांचे उमेदवारी देण्याचे समीकरणे देखील बदलतात. परंतु सर्व पक्षांनी बाहेरून आलेला व वाॅर्ड वा प्रभागा  बाहेर वास्तव्य करणार्यास उमेदवारी देऊ नये. दिल्यास मतदार आपला रोष ईव्हिएमच्या माध्यमातून व्यक्त करतील असा त्यांचा कल दिसून येतो.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!