Home » चुकीच्या इतिहासाचा प्रतिकार करा : पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

चुकीच्या इतिहासाचा प्रतिकार करा : पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

by Navswaraj
0 comment

अकोला : भारतीय लोकांना आजही चुकीचा इतिहास शिकवला जातोय. त्यामुळे पिढ्यान् पिढ्यांमध्ये चुकीचा पायंडा पडत चालला आहे. केवळ चरखा  चालवून देशाला स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिलीय हे देखील भावी पिढीला कळलेच पाहिजे, असे ठाम मत ज्येष्ठ पत्रकार तथा वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केले. अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते.

इतिहासात भगवान परशुराम एकमेव असे ब्राह्मण होते जे शास्त्र आणि शस्त्र दोघांचीही गोष्ट करतात. आजही आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. अशा खोट्या वृत्तीचा प्रतिकार केला पाहिजे. गांधीजींच्या भजनामध्ये ईश्वर, अल्लाह तेरो नाम हे कधीच नव्हते. परंतु ही बाब नंतर समाविष्ट करण्यात आली. काँग्रेसची स्थापनाच मुळात विदेशी व्यक्तीने केली आहे. भारतातील काँग्रेसचे कुळ आणि मूळ विदेशी असल्याने आजही काँग्रेस विदेशी असल्याचे कुलश्रेष्ठ म्हणाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांना डावलून नेहरूंना काँग्रेसचा अध्यक्ष आणि देशाचा पंतप्रधान करण्यात आले. काँग्रेसच्या झालेल्या निवडणुकीत वल्लभभाई पटेल यांना १५ मधुन १२ मते मिळाली होती. परंतु महात्मा गांधी यांनी नेहरूंचा पराजय हा आपला पराजय असल्याचे नमूद करीत नेहरूना काँग्रेसचा अध्यक्ष व पंतप्रधान केले. इंग्रजांच्या मदतीनेच नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले असेही कुलश्रेष्ठ यांनी नमूद केले.

गांधी-नेहरू यांच्यापेक्षाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य महान आहे. त्यांनी फ्रान्स, जर्मनी, जापानच्या सहकार्याने स्वातंत्र्याची घोषणा केली. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू होते. परंतु अचानक त्यांचा रहस्यमयपणे अपघाती मृत्यू झाला. असाच प्रकार लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीत झाला. बोस यांचा परिवार भारतीय राजकारणात नाही. त्यांचा कुठलाही पक्ष देशात नाही या वास्तविकतेकडे वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

error: Content is protected !!