Home » अकोल्यात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

अकोल्यात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

by Navswaraj
0 comment

अकोला : व्यसनमुक्तीसाठी आरोग्य विभाग तसेच सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे कि, महानगरातील अनेक शाळा तसेच महाविद्यालयाच्या बाहेर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे.

सिगरेट व तंबाखूजन्य उत्पादन विक्री कायदा २००३ च्या कलम ६ (अ) नुसार लहान मुलांना तंबाखू विकणे तसेच त्यांचे कडून विक्री करून घेणे गुन्हा आहे, ६ (ब) नुसार शाळा, महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्थेच्या शंभर मिटर परिघात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असून, वर्ष २०१२ पासून गुटखा बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे.

कायदा आणि नियम धाब्यावर बसवून महानगरातील शाळा, महाविद्यालया जवळ तसेच बहूतांश पानपट्टया तसेच अन्य ठिकाणांवर तंबाखूजन्य पदार्थांची सर्रासपणे विक्री सुरू आहे. लहान मुले व तरूणांना याची सवय लागून व्यसनाधिन होत आहेत. त्यांच्या स्वस्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे.

मेडिकल रिसर्चने पुष्टी केली आहे की, तंबाखू सेवनामुळे देशात दरवर्षी दहा लाख पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात, तोंड, घसा, फुफ्फूसचा कॅन्सरच्या ९०% प्रकरणात, तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या बस तसेच रेल्वे बोगीतील विक्रेते, तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा खुलेआम विकतात. शासकीय, निमशासकिय कार्यालय, धार्मिक स्थळ, इस्पितळांजवळ देखील विक्री सुरू आहे. अन्न व औषध, पोलीस, परिवहन महामंडळ तसेच रेल्वे या सर्व विभागांनी याबाबत गंभीरपणे कारवाई करावी.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!