Home » विठ्ठल मंदिर मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करावी

विठ्ठल मंदिर मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करावी

by Navswaraj
0 comment

अकोला : जुन्या शहराचा भौगोलिक विस्तार वाढला आहे. डाबकी रोड वरील उड्डाणपूलापलीकडे वस्ती पसरली आहे. नवीन शहरातून डाबकी रोड कडे जाण्या तसेच येण्यासाठी लहान पुलावरून भीम नगर, मोठ्या पुलावरुन काळा मारुती, विठ्ठल मंदिर तसेच मोठ्या पुलावरुन जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी नगर मार्ग आहेत. या सर्व मार्गांवर डाबकी रोड कडून येणारे तसेच जाणाऱ्यांची दररोज वर्दळ असते.

मोठ्या संख्येने नागरीक मोठ्या पुलावरुन काळा मारुती, विठ्ठल मंदिर मार्गाचा वापर करतात. हा रस्ता अरूंद असल्यामुळे श्री वीर हनुमान चौकात बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. यामार्गावर दोन शाळादेखील आहेत, शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होते. चौकात किरकोळ अपघात होतात. पादचार्यांना मोठी कसरत करावी लागते.

पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून यामार्गावर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत एकेरी वाहतूक सुरू ठेवावी अथवा दुतर्फा सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करावी. अशी याभागातील नागरीकांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!