Home » गडचिरोलीत जहाल माओवादी चकमकीत ठार

गडचिरोलीत जहाल माओवादी चकमकीत ठार

by Navswaraj
0 comment

गडचिरोली : मौजा तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडण्यात येत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या नक्षल विरोधी अभियानात हक्केर जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एक माओवादी ठार झाला आहे.

सुमारे ४५ मिनिट चाललेल्या या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव समीर ऊर्फ साधु लगा मोहंदा असे आहे. ठार झालेला नक्षलवादी ३१ वर्षांचा असून तो तुमरकोडी या भामरागड तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर दोन चकमक व 2 ईतर असे चार गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये चातगाव दलममध्ये सदस्य पदावर समीर भरती झाला होता. २०१७ मध्ये त्याला प्लाटुन क्रमांक सातमध्ये बदली देण्यात आली. माओवादी नेता भास्करचा तो सुरक्षा गार्ड होता. २०१८ मध्ये तो कंपनी चारमध्ये कार्यरत होता. त्यानंतर कंपनी क्रमांक दहामध्ये त्याची बदली करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!