Home » पातुरातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; एक ठार

पातुरातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; एक ठार

by Navswaraj
0 comment

अकोला : जिल्ह्यातील पातूर परिसरात असलेल्या एका फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात एक जण ठार झाला. हा कारखाना एकट भागात असल्याने जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृतक व्यक्तीचे नाव रज्जाक सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांदळी बुद्रुक येथे एका निर्मनुष्य परिसरात फटाक्याचा कारखाना होता. सोमवारच्या सुमारास या फटाका फॅक्टरीत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, संपूर्ण फॅक्टरी जमीनदोस्त झाली. कारखान्यात काम करीत असलेल्या एकाला गंभीर दुखापत झाली असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. भंडारज शेत शिवारात हा फटका कारखाना सुरू होता असे पोलिसांनी सांगितले. सकाळी दहा वाजताच्या सुमारास कारखान्यात काम सुरू असताना अचानक येथे स्फोट झाला. हा स्फोट उन्हामुळे झाला की कामगारांच्या चुकीमुळे याबाबत आताच सांगता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरीश गवळी यांनी कारवाईला सुरुवात केली.

error: Content is protected !!