Home » अमरावती विभागासह विदर्भात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

अमरावती विभागासह विदर्भात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

by Navswaraj
0 comment

नागपूर : अमरावती विभागासह संपूर्ण विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. गेल्या सहा ते सात महिन्यात आठशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील पावणे दोनशे शेतकरी एकट्या अमरावती विभागातील आहेत.

मुंबईतील मंत्रालयात एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सततची नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर अशा अनेक संकटांची मालिका विदर्भात कायमच आहे. अशात शेतकऱ्यांवरील कर्ज, नापिकी, पिकांची नासाडी व कर्जाचा डोंगर अशा समस्या वाढतच आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात दोनशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारकडुन अर्थसहाय्य करण्यात येते. परंतु आत्महत्याग्रस्त एकूण परिवारांपैकी २४१ परिवारांना मदत देण्यात येत आहे. २१३ शेतकरी कुटुंब अपात्र ठरविण्यात आले आहेत. ३५६ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी जास्त आहे. तीन वर्षात ४ हजार ३२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्यांची संख्या ३ हजार ३६९ आहे. नागपूर विभागातील ९५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!