Home » आता महावितरण कंपनी लावणार स्मार्ट मीटर 

आता महावितरण कंपनी लावणार स्मार्ट मीटर 

by Navswaraj
0 comment

अकोला : राज्यात महावितरण कंपनीचे जवळपास पावणेतीन कोटी वीज ग्राहक आहेत. त्यांच्या वीज वापराची नोंद घेण्यासाठी महावितरण कंपनी आता स्मार्ट मीटर लावणार आहे. यासाठी कंपनीने सहा एजन्सी निश्चित केल्या आहेत. स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी अंदाजे 28 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

महावितरण कंपनी राज्याच्या कानाकोपऱ्यात वीज पुरवठा करते. अशा मीटरचे वाचन घेणे, बिले बनवणे तसेच बिलाची रक्कम वसूल करणे यासाठी महावितरण कंपनीला मोठी कसरत करावी लागते. अनेक वीज ग्राहक वेळेवर बिल भरत नसल्यामुळे महावितरण कंपनीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. या मीटरचे वैशिष्ट्य असे की एखाद्या वीज ग्राहकाने बिल न भरल्यास महावितरण कंपनीला त्याचे दारी जाऊन वीजपुरवठा खंडित करण्याची आवश्यकता नाही. महावितरण कंपनी त्या ग्राहकाचा वीजपुरवठा कार्यालयात बसून खंडित करू शकते. या मीटरमुळे वीज चोरीलाही आळा बसणार आहे. लवकरच मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!