Home » यानंतर कुणापुढेही स्वत:ला सिद्ध करणार नाही : धीरेंद्र महाराज

यानंतर कुणापुढेही स्वत:ला सिद्ध करणार नाही : धीरेंद्र महाराज

by Navswaraj
0 comment

रायपूर (छत्तीसगड) : बागेश्वर धाम सरकारने आचार्य धीरेंद्र कृष्ण महाराज यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर व त्यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर नागपुरात वातावरण तापले आहे. या आव्हानाला धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथील कथेत प्रत्युत्तर दिले आहे.

रायपूर येथील सभेदरम्यान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी देशभरातील मीडिया प्रतिनिधींना बोलावले होते. त्यापैकी एकाचे नाव उच्चारत त्यांनी पत्रकारांसमक्ष अनेक धक्कादायक खुलासे केले. विशेष म्हणजे या नॅशनल चॅनलच्या पत्रकाराने ‘आपण कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाईल असे कृत्य केले नाही. परंतु आत बागेश्वर धाम सरकार की जय म्हणतो’, असे नमूद केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक चॅनल्सने धीरेंद्र कृष्ण महाराज यांची परीक्षा घेतली आहे. परंतु नागपुरात एकेरी उल्लेख झाल्याने ते संतापले होते.

रायपूरमधील दरबारात स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केल्यानंतर त्यांनी यापुढे आपण कुणालाही सनातन धर्माचे प्रमाण देणार नाही, ही शपथ घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रा. श्याम मानव यांना महाराष्ट्रात बजरंग दलाने लक्ष्य केले आहे. प्रा. मानव हे फक्त हिंदू धर्माला लक्ष्य करीत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ईतर काही कट्टरपंथीयांच्या धर्मातील अंधश्रद्धेबद्दल बोलावे असे आव्हान बजरंग दलाने दिले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!