Home » ‘ऑक्टोबर हिट’पासून आता दिलासा; थंडीत वाढ

‘ऑक्टोबर हिट’पासून आता दिलासा; थंडीत वाढ

by Navswaraj
0 comment

अकोला : राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा यंदा चांगलाच होता. आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

विदर्भात तापमानाचा कहर अजून कमी झालेला नाही. पारा अजूनही 37 अंश सेलसियसवर आहे. आता राज्यातील सर्वच शहरांचे तापमान कमी होऊ लागल्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. राज्यातही काही भागांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. यंदा थंडीचे एकूण दिवसही कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!