Home » नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत

नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत

by Navswaraj
0 comment

नगपूर : जयेश पुजारी ऊर्फ कांथा ऊर्फ शाकीरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरून केल्याची खळबळजनक माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

जयेश पुजारी ऊर्फ कांथा ऊर्फ शाकिर याने वारंवार गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी केली होती. सुरुवातीलला साधारण दिसणारे हे प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागेदोरे देशाच्या सीमेपलीकडेही जात आहेत आणि त्याअनुषंगाने नागपूर पोलिस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

बेळगावच्या तुरुंगात कैद असताना जयेश पुजारीने १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन केला होता. या वेळी त्याने पहिल्यांदा १०० कोटी आणि दुसऱ्यांदा १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती. गडकरींना आलेल्या धमकीच्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. अकबर पाशा हा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) सदस्य आहे. त्यामुळे बेळगाव कारागृहात कैदेत असलेल्या अकबर पाशासह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची नागपूर पोलिस चौकशी करणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!