Home » पीकेव्हीकडून नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

पीकेव्हीकडून नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

by Navswaraj
0 comment

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलैला आयोजित ३६ व्या दीक्षांत समारंभात नितीन गडकरींना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. एम. एल. मदान आदी यावेळी उपस्थित होते. दीक्षांत समारंभात ३२३४ पदवीधर, ३८१ पदव्युत्तर व आचार्य ३१ असे एकूण ३६४६ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. एम.एससी उद्यानविद्यामध्ये सर्वाधिक चार पदके शुभांगी प्रमोद देवकर या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आलीत. बी.एससी. कृषीमध्ये दुर्गेश कैलास नरवाडे याने सहा पदके प्राप्त केली. बी.टेकमध्ये अश्विनी वासुदेव हुशे हिने सात पदके प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!