Home » कोल्हापुरात अशीही वरात; पाणीप्रश्न मिटत नाही तोपर्यंत हनीमून नाही

कोल्हापुरात अशीही वरात; पाणीप्रश्न मिटत नाही तोपर्यंत हनीमून नाही

by Navswaraj
0 comment

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एका नवविवाहित दांपत्याने पाणी प्रश्न निकाली काढण्यासीठी चक्क टँकरवरून वरात काढली आहे. याशिवाय जोपर्यंत गल्लीतील पाणीटंचाईचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत हनीमूनला जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने सर्व जण आश्चर्य चकित झाले आहेत.

मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे विवाहबद्ध झाले. त्यानिमित्ताने त्यांची आज महाद्वार रोड मिरजकर तीकटी खासबाग परिसरातून अभिनव पद्धतीने हलगी लेझीम गुनक्याच्या तालावर वरात काढण्यात आली. गल्लीतील पाणी टंचाईच्या प्रश्नावरून त्यांनी ही अनोखी वरात काढण्याचे ठरवले. यामध्ये पाण्याच्या टँकरवर वधू वर बसले होते. त्यांच्या मागे मोठा फलक होता. ज्यावर महापालिकेच्या नळाला नियमित पाणी येत नाही, म्हणून बायकोला त्रास नको, म्हणूनच आम्ही पाण्याचा टँकर घेतला असा लक्षवेधी मजकूर लिहिण्यात आला होता.

टँकरच्या पुढे महिला, मुले डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन हलगीच्या तालावर नाचत होते. त्या पाण्याच्या टँकरवर आणखी एक लक्षवेधी वाक्य दिले होते. जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनीमूनला जाणार नाही. ही लग्नाची वरात रात्री उशिरा नवरदेवाच्या गल्लीत पोहोचल्यावर नवदांपत्यांनी टँकरची पाईप हातात घेऊन ते घरात पाणीपुरवठा केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!