Home » नवा वाद : नागपुरातील प्रदर्शनात मोदींना दाखविले राम आणि विष्णू रुपात

नवा वाद : नागपुरातील प्रदर्शनात मोदींना दाखविले राम आणि विष्णू रुपात

by Navswaraj
0 comment

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित पेन्टिंग्जचे प्रदर्शन नागपूरमध्ये भरवण्यात आले आहे. नागपूरसह देशभरातील कलावंतांनी तयार केलेले हे पेटिंग्ज आहेत. यातील एका चित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णू रुपात दाखविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भुवनेश्वरच्या सुरेंद्र आर्ट गॅलरीच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मोदी@२०’ असे पेन्टिंग्ज प्रदर्शनाचे नाव आहे. प्रदर्शनाचे उद‌्घाटन नागपूरचे माजी महापौर तथा भाजप नेते दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा मोदी यांचा प्रवास दाखविण्यात आला आहे. एका पेंटिंगमध्ये तर चक्क मोदींना विष्णुजींचा अवतार दाखविण्यात आले आहे. दुसऱ्या पेंटिंगमध्ये भगवान राम दाखविण्यात आले आहे. यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!