Home » नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी साजरी

नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी साजरी

by Navswaraj
0 comment

अकोला : वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे तेलीपुरा येथील सुभाष चौक तसेच जुन्या शहरातील जयहिंद चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी भाजप नेते डॉ. अशोक ओळंबे यांनी नेताजींच्या पुतळ्याची स्वच्छता करून जलाभिषेक व पूजन केले. जुन्या शहरातील जयहिंद चौकातील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे देखील पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला डॉ. अशोक ओळंबे, सुभाष अंधारे माजी नगरसेवक, सुरेश अंधारे, राजेश गीते, नितीन देशमुख, बाळू चांदवडकर, प्रमोद काळे, ओम वाकोडे, गजानन गोलाईत, प्रदीप गायकवाड, कमलेश पटले, आशिष शर्मा, प्रभाकर वानखडे, प्रकाश नानकदे, सोनू उज्जैनकर, आशुतोष काटे, दीपक गवारे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. वृत्तपत्र विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष संतोषकुमार बारस्कर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!