Home » ‘भारत जोडो’ यात्रेत भारताचे नव्हे, नेपाळचे राष्ट्रगीत

‘भारत जोडो’ यात्रेत भारताचे नव्हे, नेपाळचे राष्ट्रगीत

by Navswaraj
0 comment

अकोला : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान भारताचे नव्हे तर नेपाळचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले. हा प्रकार पाहुन राहुल यांनाही धक्का बसला. वाशीम जिल्ह्यातील मेडशी येथे हा प्रकार घडला. सोशल मीडियावर राहुल यांना यामुळे ट्रोल करण्यात येत आहे. भाजपनेही काँग्रेसला यावरुन लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या विदर्भातून जात आहे. वाशीम जिल्ह्यातील मेडशी येथुन वाडेगावकडे यात्रेने प्रस्थान केले. यावेळी राष्ट्रगीतसाठी उभे राहण्याची सूचना लाऊडस्पीकरवरून करण्यात आली. राष्ट्रगीत सुरू झाले, परंतु ते ‘जन गन मन..’ नव्हते तर चक्क नेपाळचे राष्ट्रगीत होते. गाण्याचे बोल सुरू झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांना चांगलाच धक्का बसला. वाजणारे गाणे हे भारताचे राष्ट्रगीत नसून भलतेच गाणे असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल यांनी गीत थांबविण्याची सूचना केली. मात्र तोपर्यंत या प्रकाराचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत खासदार राहुल गांधी यांची चांगलीच खिल्ली उडविली. राहुल गांधी यांना जोकर संबोधत त्यांनी आपले राष्ट्रगीतही कळत नाही अशी जहरी टीका राहुल यांच्यावर केली. भाजप नेते नीतेश राणे यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!