Home » राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात आंदोलन

by Navswaraj
0 comment

अकोला : महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांना फोडून सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गद्दार दिवस’ अशा आशयाचे फलक हाती धरत हे आंदोलन केले.

बस स्थानकाजवळ असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात हे आंदोलन करण्यात आले. संग्राम गांवडे यांच्या नेतृत्वात खोके सरकार‌ हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेता प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रा. विजय उजवणे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, विद्या अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष परिमल लहाने, डॉ. तेजराव नाराजे, श्याम वाहुरवाघ, जिल्हा परिषद सदस्य विशाल गावंडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, करन दौड, सुनिल महल्ले, शिवाजी पटोकार, गजानन भटकर, अश्वजित शिरसाट, अक्षय भगेवार, सय्यद अन्सार अली, शंकर कंकाळ, बाळासाहेब घुमरे, संतोष मुळे, सुषमा कावरे, दीपमाला खाडे, मेघा पाचपोर, कोकिळा डाबेराव, वंदना चव्हाण, अरुण कडू, श्याम कोहर, किशोर राजुरकर, प्रकाश सोनोने, नीलेश गुडदे, राहुल खेडकर, अजय सावरकर, अमोल वलीवकर ,अभिजित टाले, वैभव बानुवाकोडे, सूरज इंगळे, रोहन हर्षलकर, अभी नरवाडे आदी आंदोलनात सहभगी झाले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!