Home » पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी नाही

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी नाही

अमरावती दौऱ्यात सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप

by Navswaraj
0 comment

अमरावती : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. यामुळे अजित पवार यांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमरावती दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने विनंती स्वीकारली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती. मात्र पवारांचे भाषण झालेच नाही. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे. तिथे विरोधी पक्षनेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्यांना भाषण करु देत नाहीत. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

error: Content is protected !!