Home » नागपुरात पवार म्हणाले, सावकर हा राष्ट्रीय इश्यू नाही!

नागपुरात पवार म्हणाले, सावकर हा राष्ट्रीय इश्यू नाही!

by Navswaraj
0 comment

नागपूर : आजच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय इश्यू नाही, असं ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील शेतीच्या प्रश्नांबरोबरच राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चाललेल्या राजकारणावर महत्वपूर्ण भाष्य केले. शरद पवार यांना राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तुम्ही आणि राहुल गांधी, सावरकर या विषयावर कधी काय बोलला होता का, यावर बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यातील आणि देशातील अनेक महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत, पुढे बोलताना महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीविषयी आगामी काळात काय प्रयोग करता येतील. आणि त्याचा फायदा या शेतकऱ्यांना कसा होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले. विरोधकांची मोट बांधण्याचं काम जरी सुरू असलं तरी, ते अजून चर्चात्मक पातळीवरच सुरु आहे. मात्र अजूनही त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!