Home » नक्षली हल्ल्यात छत्तीसगडमध्ये ११ जवान शहीद

नक्षली हल्ल्यात छत्तीसगडमध्ये ११ जवान शहीद

by नवस्वराज
0 comment

नागपूर : छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोकं वर काढलय. गस्त घालत असलेल्या जवानांच्या ताफ्यावर दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद झालेत. भू-सुरूंग स्फोट घडविल्यानंतर नक्षलवाद्यांनही सुरक्षा दलांवर बेछुट गोळीबार सुरू केला.

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सध्याही चकमक सुरू आहे. जेथे हा स्फोट घडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावार पाऊस सुरू असल्याने मदत पोहोचविण्याचे काम अवघड जात आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र छत्तीसगड आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील गडचिरोली जिल्ह्यातील गस्तही वाढविण्यात आली आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसान डिस्ट्रिक रिझर्व्ह गार्डचे दहा जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. अरनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे लोक गस्त घालत होते. येथे नक्षलवाद्यांनी कॅम्प लावल्याची माहिती डीआरजीला मिळाली होती. पोलिस दल येथे पोहोचताच नक्षलवाद्यांनी तत्काळ स्फोट घडविला. या स्फोटात एका चालकासह दहा जवान शहीद झालेत. या घटनेची माहिती पोलिस दलाने दंतेवाडा नियंत्रण कक्षाला सॅटेलाईट फोनवरून दिल्यानंतर अतिरिक्त कुमक अरनपूरच्या जंगलाकडे रवाना करण्यात आली आहे. मात्र या भागात तुफान पाऊस सुरू असल्याने आणि जंगलाचा भाग घनदाट असल्याने तिथर्यंत पोहोचणे अवघड होत असल्याची माहिती दंतेवाडा पोलिसांनी ‘नवस्वराज’ला दिली. अद्यापही ही चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!