Home » नंदीनी सोहोनी ठरली नागपूर विद्यापीठातून टॉपर

नंदीनी सोहोनी ठरली नागपूर विद्यापीठातून टॉपर

by Navswaraj
0 comment

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा १३ एप्रिल रोजी होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस या सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार नंदीनी सोहोनी हिने टॉप केले आहे. सात सुवर्णपदके व दोन पुरस्कार तिने पटकावले आहेत. दुसरा क्रमांक विक्की पडोळे याने पटकावला आहे. त्याने सात सुवर्णपदक पटकावले आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

पाच सुवर्णपदक पटकावत अंकुप्रिया प्रसाद हिने तृतीय क्रमांकावर नाव कोरलेय. आदर्श गिऱ्हेपुंजेने चार सुवर्ण, एक रौप्यपदक पटकावले आहे. सोमराज गिरडकर याने चार सुवर्णपदक व एक पुरस्कार पटकावला आहे. राजश्री ढबालेला चार सुवर्ण व एक पुरस्कार मिळाला आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात एक लाखावर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ३३० विद्यार्थ्यांना पदविका बहाल करण्यात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!