अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्यावतीने नांदेड ते मुंबईसाठी द्विसाप्ताहिक रेल्वे फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. २५, २६, ३०, ३१ जानेवारी, १, २, ६,७, ८, ९, १३, १४, १५, १६, २०, २१, २२, २३, २७, २८ फेब्रुवारी रोजी या फेऱ्या सोडण्यात येणार आहे.
नांदेड-मुंबईदरम्यान सोडण्यात येणाऱ्या या गाड्यांना पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे थांबा देण्यात आला आहे. नांदेडे-मुंबई गाडी वाशीमध्ये रात्री सव्वा वाजता पोहोचेल. अकोला येथे ३.२५ वाजता पोहोचल. परतीच्या प्रवासात अकोल्यात मुंबईहून येणारी गाडी रात्री पावणे तीनच्या सुमारास पोहोचेल व वाशीमला पहाटे चारच्या सुमारास पोहोचेल. या गाड्यांचे ऑनलाईन रेल्वे आरक्षणही उपलब्ध राहणार आहे.