नागपूर : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन प्रधान आरक्षक, तीन गोपनीय सैनिक, चार नव आरक्षक आणि एका चालक शहिद झाला आहे.
हल्ल्यात शहिद झालेल्यांची नावे दंतेवाडा पोलिसांकडून ‘नवस्वराज’च्या हाती आली आहेत. याशिवाय घटनास्थळावरील छायाचित्रही ‘नवस्वराज’ला प्राप्त झाले आहे. घटनास्थळावर तैनात असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अभियान आटोपल्यानंतर परतीचा प्रवास पोलिसांनी सुरू केला, त्यावेही हा भीषण हल्ला त्यांच्यावर करण्यात आला.
या हल्ल्यात प्रधान आरक्षक जोगा सोढी, मुन्ना राम कडती, संतोष तामो, नव आरक्षक दुग्लो मण्डावी, लखमू मरकाम, जोगा कवासी, हरीराम मण्डावी, गोपनीय सैनिक राजू राम करटम, जयराम पोडियाम, जगदीश कवासी हे शहीद झालेत. धनीराम यादव नामक चालक हे त्याचे वाहन चालवित होते. गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी तातडीने आदेश देत घटनास्थळाकडे दोन रुग्णवाहिका आणि अतिरिक्त कुमक रवाना केली. नक्षलवाद्यांनी स्फोट घडविल्याने रस्त्याचेही मोठे नुकसान झाले आहेत.

भू-सुरूंग स्फोटामुळे रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा.

भू-सुरूंग स्फोटामुळे पूर्णपणे जळुन खाक झालेले पोलिसांचे वाहन.