Home » नागपुरातील तरुणाने शेअर केला व्हिडीओ; क्रिकेट सामन्यात भारतीयांना मारहाण

नागपुरातील तरुणाने शेअर केला व्हिडीओ; क्रिकेट सामन्यात भारतीयांना मारहाण

by नवस्वराज
0 comment

नागपूर : भारत विरुद्ध बांगलादेश एक दिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान बुधवार, 7 डिसेंबरला भारतीय प्रेक्षकांना बांगलादेशी नागरिकांकडुन जबरदस्त मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर गळा कापण्याची धमकी देण्यात आली. या प्रकाराचा व्हिडीओ नागपुरातील तरुण रोहण अग्रवालने शूट केला. त्यालाही यावेळी धक्काबुक्की कारण्यात आली. त्यानंतर रोहणने फेसबुक लाईव्ह करीत हा प्रकार जगापुढे मांडला. रोहणने बांगलादेशातून ‘नवस्वराज’ला हा व्हिडीओ खास पाठवला. इतकेच नव्हे तर त्याने बांगलादेशातील भारतीय दूतावासालाही याबाबत फोनकॉल करून तक्रार दिली.

बांगलादेश विरुद्ध भारत क्रिकेट सामना सुरू असताना काही बांगलादेशी नागरिकांनी व्हीआयपी गॅलरीमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना जबर मारहाण सुरू केली. भारतीय नागरिकांनी विरोध केल्यानंतर सर्व बांगलादेशी नागरिकांनी एकत्र येत त्यांना गळा कापण्याची धमकी दिली, असा आरोप रोहण याने केला. रोहण आणि संबंधित नागरिकाने स्टेडियमच्या अधिकाऱ्यांजवळ याप्रकरणी दाद मागण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर सुरक्षा अधिकाऱ्यांनाही सांगितले. परंतु कोणीही दखल घेतली नाही असा आरोप, रोहण याने आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे.

रोहण अग्रवाल मूळ नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत त्यांनी सुमारे 5 हजार किलोमीटर पायी फिरत संपूर्ण भारत पार केला होता. सध्या तो पायीच जगाच्या प्रवासावर आहे. गेल्या काही दिवसांपासून  रोहण बांगलादेशात आहे. बुधवारी तो बांगलादेशात झालेला क्रिकेट सामना बघण्यासाठी गेला होता. बांगलादेशातील भारतीय नागरिकांना झालेल्या मारहाणीनंतर व्यथित झालेल्या रोहणने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधले आणि ‘नवस्वराज’लाही या घटनेची माहिती दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!