Home » सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार नागपूरकर वकील

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार नागपूरकर वकील

by नवस्वराज
0 comment

नागपूर : विदर्भाच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांनी देश-विदेशात आपल्या नावाचा डंका करीत विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नागपूरच्या नावलौकिकात त्यावेळी आणखी भर पडली, ज्यावेळी नागपूर येथील अधिवक्ता सिद्धार्थ धर्माधिकारी यांची महाराष्ट्र सरकारने देशाच्या सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधित्व करण्यासाठी मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.

धर्माधिकारी हे अॅड. राहुल चिटणीस यांची जागा घेतील. अॅड. सिद्धार्थ हे डॉ. अभय आणि डॉ. चारू धर्माधिकारी यांचे सुपुत्र आहेत. नागपुरात कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे २०११ ते २०१७ या काळात विधि शाखेची प्रॅक्टिस केली.

नागपुरातील प्रॅक्टिसनंतर अॅड. सिद्धार्थ हे दिल्लीला गेले. तेथे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात त्यांनी कामाला सुरुवात केली. देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यासोबत दोन वर्षे काम करण्याचा अॅड. सिद्धार्थ यांना अनुभव आहे.
सिद्धार्थच्या नियुक्तीने नागपूरच्या विधी वर्गात आनंदाची लाट उसळली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!