Home » छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत मोठा पुतळा नागपुरात

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत मोठा पुतळा नागपुरात

by नवस्वराज
0 comment

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा नागपुरात साकारण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने महाराजबाग परिसरात हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने लोकसहभागातून हा पुतळा उभारण्यात येणार आहे.

नागपुरात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कांस्य धातुपासून तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला विभाग आणि संचालनालयाने यासाठी मान्यता प्रदान केली आहे. हा पुतळा सिंहासनारुढ राहणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली. प्र-कुलगुरू संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष मुधोजी राजे भोसले, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश ड्युके, सहसचिव तथा संस्थापक प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजय शेंडे, प्राचार्य प्रविणा खोब्रागडे आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी समितीच्यावतीने लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात येणार आहे, असे यावेळी डॉ. चौधरी यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र हा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारुढ पुतळा असेल, असे डॉ. चौधरी म्हणाले. स्मारक समिती विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक अभ्यासक आणि नागरिकांसाठी प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देणार आहे. या शिक्षण केंद्रात शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. समिती उजळणी व्याख्याने, परिसंवाद इत्यादींचे आयोजन करून एक पुस्तकही तयार करेल, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

असा असेल पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याच्या चाबुतऱ्याची लांबी २० फूट आणि उंची ९ फूट असेल. रुंदी १५ फूट असेल. सिंहासरूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असेल. त्यावरील छत्र ७ फुटांचे असेल. कांस्य धातूपासून बनवलेल्या मूर्तीचे वजन १० हजार किलो असेल. मूर्तीकार सोनल कोहाड हा पुतळा तयार करीत आहेत. या पुतळ्याचे प्रातिनिधिक चित्रही जारी करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!