Home » नागपूर-अमरावती शिवशाही आगीत खाक, प्रवासी बचावले

नागपूर-अमरावती शिवशाही आगीत खाक, प्रवासी बचावले

by नवस्वराज
0 comment

नागपूर : नागपूरवरून अमरावतीकडे मार्गास्थ असलेली शिवशाही बस जळाल्यामुळे खाक झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसान नागपूरवरून १६ प्रवासी घेऊन शिवशाही बस अमरावतीकडे मार्गस्थ होती. ही बस कोंढाळीजवळ पोहोचल्यानंतर बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवशांना खाली उतरविले. त्यानंतर बसने कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळ पेट घेतला. बघता बघता बस जळुन खाक झाली. सुदैवाने यातील प्रवाशांना कोणतीही ईजा झाली नाही.

error: Content is protected !!