Home » ‘हिंदू मुलींची शाळा’तील विद्यार्थिनी शिकल्‍या ‘पोलिसगिरी’ 

‘हिंदू मुलींची शाळा’तील विद्यार्थिनी शिकल्‍या ‘पोलिसगिरी’ 

by Navswaraj
0 comment

नागपूर : श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महाल येथील विद्यार्थिनींना पोलिसगिरी पथकाद्वारे मार्गदर्शन करण्‍यात आले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी, छेडछाड तक्रारीत विद्यार्थिनींना त्रास होऊ याकरिता पोलिसगीरी पथक जनजागृती करण्‍याचे कार्य करते. पोलिसगिरी या उपक्रमांतर्गत कोतवाली महाल येथील सहायक पोलिस निरीक्षक छाया गुजर यांनी यावेळी विद्यार्थिनींना सुरक्षिततेसाठी सजग राहण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पोलिसगिरी हे पथक सतत कार्यरत असून शाळेतील विद्यार्थिनींना स्‍वत:ला सुरक्षित समजावे, असे आवाहन छाया गुजर यांनी केले. स्वरक्षणार्थ पाऊल उचलण्यासंदर्भात त्‍यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. यावेळी मंचावर शाळेचे मुख्याध्यापिका माया बमनोटे, पर्यवेक्षक बोबडे, डब्‍ल्‍यूपीसी सीमा व अंबिका यांची उपस्थिती होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!