Home » नागपूरच्या डबलडेकर मेट्रो पुलाची गिनिज बुकात नोंद

नागपूरच्या डबलडेकर मेट्रो पुलाची गिनिज बुकात नोंद

by Navswaraj
0 comment

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेच्या वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वांत लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

नागपुरातील या 3.14 किलोमीटर लांबीच्या डबल डेकर व्हाया-डक्टला आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या आधीच मानांकन मिळाले आहे. येत्या 6 डिसेंबर 2022 रोजी मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यासंबंधीचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!