Home » Crime News : मावशीच्या तब्येतीचे कारण सांगत अल्पवयीन विद्यार्थिनीला लुबाडले

Crime News : मावशीच्या तब्येतीचे कारण सांगत अल्पवयीन विद्यार्थिनीला लुबाडले

Gondpipri : सहा तोळे सोने लुटले; गुन्हा दाखल

by नवस्वराज
0 comment

अभिजीत कराळे | Abhijeet Karale  

Chandrapur Police : गोंडपिपरी येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला मावशीची तब्बेत बिघडल्याचे सांगत सहा तोळे सोने तिच्या जवळून लुटले. मावशीचे ऑपरेशन करण्यासाठी या शिक्षकाने पैशांची गरज असल्याची बतावणी करीत विद्यार्थिनीला भावनीकरीत्या फसविले. अखिल रोहणकर असे शिक्षकाचे नाव असून तो वडसा येथील सान्जो कॉनव्हेंटमध्ये आठ महिन्यांपूर्वी संगित शिक्षक म्हणून कामाला लागला होता. गोंडपिपरी पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले व त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक चौकशीत अखिलने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गोंडपिपरी येथील सान्जो कॉन्व्हेंटमध्ये अखिल याची संगित शिक्षक म्हणून निवड झाली होती. कान्व्हेंटमधील एका विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने आपुलकीचे नाते जोडले. अशातच त्याची नियत बिघडली.

आपल्या मावशीची प्रकृती बिघडल्याचे सांगत अखिलने विद्यार्थिनीला पैसे मागितले. पैसे नाहीत पण घरी सोने असल्याची माहिती मुलीने दिली. यानंतर अखिलने तिच्याकडे सोन्याची मागणी केली. मुलीने घरच्यांपासून लपवत शिक्षकाला सहा तोळे तीन ग्राम सोने आणून दिले. शिक्षकाने काही दिवसात सोने परत करण्याचे आश्वासन विद्यार्थिनीला दिले. मुलीने सोने परत करण्याची मागणी केली, तेव्हा अखिल टाळाटाळ करू लागला.

अखेर घाबरून विद्यार्थिनीने या सर्व प्रकाराची माहिती परिवारातील सदस्यांना दिली. माहीती कळताच घरातील सदस्य काळजीत पडले. त्यांनी मुलीला सोबत घेत शिक्षकाला विचारणा केली. त्यावेळी सोने परत करेल, अशी ग्वाही अखिलने दिली. पण अनेक दिवस झाल्यावरही सोने परत केले नाही. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी गोंडपिपरी पोलिसात अखिलविरोधात तक्रार दाखल केली.

गंभीर प्रकार लक्षात घेत गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. पोलिस अखिलच्या घरी पोहोचले. पण त्याच्या घराला कुलूप होत. कॉन्व्हेटमधून त्याने राजीनामा दिल्याचे कळले. त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास करून अखिल रोहणकर याला चंद्रपुरातून ताब्यात घेतले. तपासात अखिलने मावशीच्या तब्बेतीचा बहाणा करीत अनेक विध्यार्थ्यांना व लोकांना फसवल्याचे उघड झाले आहे. किती लोकांची फसवणूक झाली याची तपास पोलिस  करत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!