Home » रिधोऱ्याजवळ बंद पडली एसटी महामंडळाची बस

रिधोऱ्याजवळ बंद पडली एसटी महामंडळाची बस

by Navswaraj
0 comment

अकोला : सुमारे ५० प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस अकोला-बाळापूर मार्गावर असलेल्या रिधोराजवळ बंद पडली. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांना उन्हातच ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे अनेक प्रवाशांना उन्हाचा त्रास झाला.

यवतमाळ येथुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील रिधोराजवळ बस आली असता त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे बस रस्त्यातच बंद पडली. प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी बसच्या चालक आणि वाहकाने पर्यायी बससाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला. परंतु पर्यायी बस लवकर न आल्यामुळे नादुरूस्त बसमधील ५० प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!