Home » मोझरीजवळ एसटी महामंडळाची बस पेटली

मोझरीजवळ एसटी महामंडळाची बस पेटली

by नवस्वराज
0 comment

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पेटली. मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अमरावतीवरून ही बस नागपूरकडे निघाली होती. मोझरीजवळ ही बस आली असता त्यात बिघाड निर्माण झाला. चालक आणि वाहकाने वेळीच समयसूचकता दाखवत प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर बघता बघता बस पेटली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचेस्तोवर बस पूर्णपणे जळाली होती.

error: Content is protected !!