Home » अकोल्यातील कुख्यात गुंड स्थानबद्ध

अकोल्यातील कुख्यात गुंड स्थानबद्ध

by Navswaraj
0 comment

अकोला : दंगल, बाल लैंगिक अत्याचार, विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका कुख्यात गुंडास जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी एमपीडीए अॅक्टअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. स्वप्नील बसवंत वानखडे (वय २८, रा. अकोट) हे स्थानबद्ध करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे.

स्वप्नील विरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कोणत्याही कारवाईला तो जुमानत नव्हता. त्यामुळे त्याला कारागृहात टाकण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे पाठविला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष महल्ले, पोलिस हेड कॉंस्टेबल मंगेश महल्ले, अकोट फैलचे निरीक्षक महेंद्र कदम, प्रवेश काळे आदींनी हा प्रस्ताव तयार करण्यासाठी सहाय्य केले.

error: Content is protected !!