Home » भावना गवळी यांचे वाशीममध्ये शक्तीप्रदर्शन; ठाकरेंना दाखविला आरसा

भावना गवळी यांचे वाशीममध्ये शक्तीप्रदर्शन; ठाकरेंना दाखविला आरसा

by नवस्वराज
0 comment

वाशीम : एकनाथ शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी यांनी वाशीममध्ये शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

खासदार गवळी म्हणाल्या ‘मला सगळे बोलतात ताई भांडत राहते. भांडल्याशिवाय काही मिळत नाही. मी त्याच दिवशी सांगितले, टायगर अभी जिंदा है. लढाई लढताना माझे वडील यांनी शिवसेनेचे व्रत घेतले. शाखा उभ्या केल्या. माझ्या वडिलांनी माझ्यावर तेच संस्कार केले. मी विद्यार्थी सेनेत गेले. त्यावेळी राज ठाकरे आमचे नेतृत्व करत होते. वाशीम जिल्ह्याचे शिल्पकार माझ्या वडिलांना म्हटले जाते. तुम्ही मला पाच वेळा निवडून दिले. मी धन्य आहे. माझ्यावरच्या विश्वास संकटामध्ये मला मदत मिळाली. आशीर्वाद मिळाला. शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा काम केले आहे.’

‘आम्ही गद्दार आहोत असे जे लोक बोलतात. आम्हाला गद्दार म्हणतात त्यांना सांगतो. आमच्या बापाने शिवसेना उभी केली. १२ खासदार, ५० आमदार बाहेर पडले. त्यांना आता चिंतन करण्याची गरज आहे. पुन्हा तुमच्या साक्षीने सांगतो. भगवा या मतदारसंघात फडकवेल. नेता कसा असावा, तर सर्व सामान्याचे अश्रू पुसणार असावा. ते काम एकनाथ शिंदे करत आहेत. देवेंद्र फडणवीस विकासकामे करत आहेत. मोठमोठी कामं त्यांनी केलीत. हे दोघे विकासकाम करत आहेत’, असे गवळी यांनी सांगितले.

मतदार संघाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘वाशीम जिल्ह्यातील खंडवा-पूर्णा रेल्वे लाईन मोठी केली. वाशीमच्या धरणाची उंची वाढवावी, येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. विदर्भातील ही माझी पहिली सभा आहे. आतापर्यंत सगळ्यांनी मला साथ दिली आहे. मी लपंडाव न करता थेट कामे करणारी आहे. त्यामुळे भविष्यातही शंभर टक्के विकासावर भर राहणार आहे.’

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!