Home » Rajya Sabha : ‘जो नही राम का, वो नही किसी काम का’

Rajya Sabha : ‘जो नही राम का, वो नही किसी काम का’

BJP On Congress : राज्यसभेत कडाडले खासदार डॉ. अनिल बोंडे

by नवस्वराज
0 comment

अश्विन पाठक | Ashvin Pathak 

New Delhi : प्रभु श्री रामचंद्राचे भव्य मंदिर अयोद्धेत सर्वसामान्यांकरिता खुले झाले आहे. भाविक हजारोंच्या संख्येने दर्शन घेत आहेत. प्रभु श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना त्याला निमंत्रणाची आवश्यता नव्हती. या कार्यक्रमात सर्वांधिक अडथळे आणण्याचे काम काँग्रेसने केले, अशी टीका अमरावतीचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

काँग्रेसने रामभक्तांचा अपमान केला. त्यांना न्यायालयात खेचले. ‘जो नही राम का, वह नही किसी काम का’ असे सांगत भाजपचे खासदार बोंडे यांनी काँग्रेवर जोरदार टीका केली. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेत अंतरिम बजेटबाबत चर्चा सुरू असताना डॉ. बोंडे बोलत होते. सेवा, सुशासन अन् गरीब कल्याणातून राष्ट्राच्या विकासाचे, उन्नतीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा ‘न भुतो न भविष्यती‘ विकास केला. अनेकदा अर्थसंकल्पात भविष्याचा विचार केला जात नाही. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्टी ठेऊन बजेट आकाराला आणले आहे. सर्वांना याचा चांगला फायदा होत आहे. राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर सूर्योदय योजनेची प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली. त्यातून एक करोड घरांवर मोफत सोलर पॅनल बसविले जाणार आहे.

वीज निर्मितीसोबत रोजगार प्राप्त होईल. काँग्रेसचे पदाधिकारी गावागावात जावून निवडणुकीचा प्रचार करतात, तेव्हा नागरिक त्यांना विचारत आहेत, 70 वर्षांत तुम्ही काय केले? त्या तुलनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत घर दिले, नळाद्वारे पाण्याची सोय करून दिली, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसची जोडणी दिली. आता घराच्यावर वीज वाचविण्यासाठी सौर ऊर्जेचे पॅनलही बसविले जात आहे. शाश्वत विकासच्या दिशेने भारताचे वाटचाल होत असल्याचेही डॉ. बोंडे यांनी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!