Home » खुशखबर : मान्सून पूर्णपणे विदर्भात दाखल

खुशखबर : मान्सून पूर्णपणे विदर्भात दाखल

by Navswaraj
0 comment

नागपूर : काही दिवस मंद प्रवास केल्यानंतर अखेर मान्सून विदर्भात पूर्णपणे दाखल झाला आहे. भारतीय मौसम विभागाच्या नागपूर वेधशाळेने गुरुवार, १६ जून रोजी ही माहिती दिली.

मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासोबतच वेधशाळेने येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा ईशारा दिला आहे. नागपूरसह भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात १६ जूनपासून पावसाचा ईशारा देण्यात आला आहे. वाशीम जिल्ह्यात १८ जूनपासून पावसाचा ईशारा देण्यात आला आहे. १८ आणि १९ जून रोजी वाशीम वगळता अन्य जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होईल असे मान्सूनच्या नकाशावरून दिसत असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘नवस्वराज’शी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!