Home » शेतकरी आत्महत्या, राष्ट्रसंतांच्या ओव्या आणि आमदार मिटकरी

शेतकरी आत्महत्या, राष्ट्रसंतांच्या ओव्या आणि आमदार मिटकरी

by Navswaraj
0 comment

मुंबई : शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यासंदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी विधान परिषदेतील सर्वांचे लक्ष वेधले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अनेक रचनांच्या दाखला देत आमदार मिटकरी यांनी सत्ताधारी मंत्र्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात झालेल्या अनेक शेतकरी आत्महत्यांचा पाढाच त्यांनी वाचला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना आवाहन करीत मिटकरी यांनी त्यांच्याकडै पुण्य मिळवून देणारे कृषिखाते असल्याचा उल्लेख केला.

विदर्भातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशात सरकारी निकषांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपते तो दिवस पोळ्याचा आहे. शेतकरी एकवेळ दसरा-दिवाळी साजरा करीत नाही, परंतु पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना भेट द्यावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!