Home » संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार हे घरगडी

संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार हे घरगडी

आमदार डॉ. संजय कुटे यांची जहरी टीका

by Navswaraj
0 comment

मुंबई : महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शासन चाललं आहे, ते पाहता केवळ अपक्ष आमदारच नव्हे, तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत. संजय राऊत मातोश्रीचे घरगडी असतील किंवा विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींकडे घरगडी असतील. त्याप्रमाणे अपक्ष आमदार हे काही कुणाकडे घरगडी म्हणून काम करत नाहीत. त्यांचा स्वत:चा स्वाभीमान आहे, अशी जहरी टीका बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी केली. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच मुद्द्यावर डॉ. कुटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केवळ अपक्ष आमदारच नव्हे, तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत, असे ते म्हणाले.

error: Content is protected !!