Home » आमदार डॉ. संजय कुटे यांच्यावर मोठी जबाबदारी

आमदार डॉ. संजय कुटे यांच्यावर मोठी जबाबदारी

by Navswaraj
0 comment

सूरत : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर सूरतमध्ये दाखल झालेल्या शिवसेना आमदारांच्या बाबतीत जळगाव जामोद मतदार संघांचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डॉ. कुटे हे सूरतमधील त्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत, जेथे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार थांबले आहेत. डॉ. संजय कुटे हे भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘कोअर टीम’ मधील विश्वासू सदस्य आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर हॉटेलमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपची खेळी यशस्वी झाल्यास महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. असे झाल्यास फडणवीस यांचे दिल्लीतील वजन आणखी वाढेल, ज्याला तोड राहणार नाही असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!