Home » जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर

जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर केलेल्या टिकेला बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम ठेवण्यासाठी शिवसेनेतील आमदारांनी एक उठाव केला. हिंदुत्व जोपासयाचे असते तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत बसलेच नसते, असे गायकवाड म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने आरोप होत आहे की, पक्षाचे लेबल काढून तु्म्ही निवडून येऊन दाखवा. या टीकेला आतापर्यंक कोणी उत्तर दिले नव्हते पण संजय गायकवाड यांनी त्याचा समाचार घेतला. निवडणुकीत निवडूण येण्यासाठी केवळ पक्षच महत्वाचा असे नाहीतर त्या उमेदवराचे वजनही तेवढेच महत्वाचे असते, असे उत्तर आमदार गायकवाड यांनी दिले.

ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी खेदाने नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!