Home » Sanjay Gaikwad : मेहकर मधील राड्यानंतर आमदार गायकवाड भडकले

Sanjay Gaikwad : मेहकर मधील राड्यानंतर आमदार गायकवाड भडकले

by Navswaraj
0 comment

बुलढाणा (Buldhana) : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेहकर येथे धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी-काठीसह दगडांनी मारहाण केली. या टोळक्याने घरांवरही हल्ला केला. याप्रकारामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड भडकले आहेत. (MLA Sanjay Gaikwad From Buldhana gets Angry on eve teasing at Mehekar on Diwali)

या राड्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार संजय गायकवाड आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या ४०-५० वाहनांचा ताफा घेऊन मेहकरमध्ये पोहचले. त्यांनी मेहकरच्या ठाणेदारांना चांगलेच धारेवर धरले. माझा हिशोब बाकी आहे. संबंधित गुंडांना जामिन मिळाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास छेडखानीचा प्रकार घडला. ४३ वर्षीय नेहा काटकर यांच्या तक्रारीवरून २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार काटकर या आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत. गुंडांनी १५ वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला, अश्लील हावभाव करून मुलीची छेड काढली. तसेच काटकर यांच्या अंगावरील १ तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!