Home » राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भडकले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भडकले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड

by Navswaraj
0 comment

बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर बुलढाण्याचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी सडकून टीका केली.  “या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला, पण महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस बसवा,” अशी मागणी त्यांनी केली.

“भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा राज्यपालांनी तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींना शिवाजी म्हणतात आणि शिवाजी जुने झाले असेही सांगतात. या राज्यपालांना कळाले पाहिजे की, शिवविचार कधी जुना होत नाही. तसेच त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही.” भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना आपली विनंती आहे की, ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, राज्य काय आहे हे ज्याला कळत नाही, अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही. राज्यपालपदावर या मराठी मातीतील माणूसच ठेवावा, अशी मागणी संजय गायकवाडांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!