Home » काँग्रेसच्या अकलेचे दिवाळे : आमदार सावरकर

काँग्रेसच्या अकलेचे दिवाळे : आमदार सावरकर

by Navswaraj
0 comment

अकोला : बजरंग दलसारख्या संघटनेची दहशतवादी पीएफआय संघटनेसोबत तुलना करीत काँग्रेसने आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

कर्नाटकमध्ये बहुमत मिळाल्यास बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी आणण्याचा मुद्दा काँग्रेसने आपल्या वचननाम्यात घेतला आहे. या वचननाम्याचा आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी समाचार घेतला. काँग्रेस आणि राहुल गांधी लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद राष्ट्रहिताचे कार्य करीत आहेत. युवकांना संघटीत करीत आहे, ही बाबही जर काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कळत नसेल तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे आमदार सावरकर यांनी नमूद करीत या जाहीरनाम्याचा निषेध व्यक्त केला.

काय आहे जाहीरनाम्यात?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कर्नाटकरमध्ये सत्ता आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असे आश्वासन या जाहीरनाद्वारे देण्यात आले आहे. कर्नाटकमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भाजपा आणि बजरंग दला आणि विश्वहिंदू परिषदेनं आक्षेप घेतला आहे. बजरंग दलाची तुलना पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनेशी करणं हे दुर्दैवी आहे. आम्ही यासंदर्भात काँग्रेसला कायदेशीर उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया विश्वहिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनीही दिली होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!