Home » आमदार देशमुख उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत जाणार पायी

आमदार देशमुख उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत जाणार पायी

by Navswaraj
0 comment

अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख बाळापूर मतदार संघातील 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्यानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाविषयी माहिती दिली आहे. आमदार देशमुख हे मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून पुन्हा आंदोलन करणार आहेत. अकोला ते नागपूर अशी पदयात्रा येत्या 10 एप्रिलपासून काढणार आहे. या पदयात्रेची सुरुवात ही अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही काढण्यात येणार आहे.

बाळापूर मतदार संघातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीचं तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्यानं आमदार देशमुख चांगलेच संतप्त झाले आहे. यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्यातील वान धरणातून होणाऱ्या ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्याचा विरोधात विधानभवन परिसरात आंदोलन सुरु केलं होतं. यानंतर विधानसभेत वेगाने चक्र फिरलीत आणि त्यांना आश्वासन देण्यात आले आहे. अकोला तालुक्यातील ६९ गावांना वान धरणातून हा पाणीपुरवठा होणार होता याकरिता १०८ कोटी खर्च करून ७० किलोमीटरची पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली आहे. या स्थगिती विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असूनही देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठाला स्थगिती दिल्याचा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!